फ्रँकिंग सुविधा

भारतीय स्टॅम्प कायद्यानुसार प्रत्येक दस्ताऐवजाचे मुद्रांक शुल्क ठरवून दिले आहे. आधीच्या दशकापर्यंत सुरक्षा प्रेसमध्ये मुद्रीत केलेल्या न्यायालयीन स्टॅम्पचा वापर करण्यात येत होता. पण आता सरकारने असे स्पष्ट केले आहे की, दस्तऐवजासाठी केवळ स्टॅम्प पेपर वापरण्याची गरज नाही. ते त्यासाठी फ्रॅकींग सुविधा वापरू शकतात.

फ्रॅकींग म्हणजे दस्तांना कायदेशीर स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी सरकारकडे भरलेले मुद्रांक शुल्क होय. बॅकींग उद्योगात कर्जदाराकडून घेतलेल्या कर्ज कागदपत्रासाठी स्टॅम्प ड्युटीची आवश्यकता असते. जे प्रत्येक प्रकारच्या दस्तऐवजाकरीता त्याच्या प्रकारानुसार वेगळी असते.

यापूर्वी कायदेशीर दस्तऐवजांकरीता केवळ न्यायालयीन स्टॅम्प वापरण्यात येत होते, तेव्हा या स्टॅम्पची खरेदी करण्यासाठी कर्जदार/ग्राहकांना स्टॅम्प वेंडरच्या कार्यालयात जाणे आवश्यक होते. बर्‍याच वेळी विशिष्ठ रक्कमेचे स्टॅम्प उपलब्ध होत नसत. आता फ्रॅकींगच्या सुविधेने या अडचणींवर मात केली आहे. शासनाने फ्रॅकींग रक्कमेवर मर्यादा घातली आहे. आता प्रतीदस्ताऐवज जास्तीत जास्त 5000/- चे फॅक्रींग करता येते.छोट्या रक्कमेच्या मुद्रांक शुल्काकरीता ग्राहकास स्टॅम्पवेंडरकडे जाण्याची गरज नाही यामुळे वेळ व खर्च वाचतो. आजकाल कर्जाच्या कागदपत्रांची फ्रॅकींग हा सरकारचा मुद्रांक शुल्क भरण्याचा एक सोपा मार्ग आहे. ग्राहकांसाठी हा खुप सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. आता कागदपत्र हे बँक तयार करून त्यावर फॅक्रींग केले जाते. विश्‍वास बँकेने केवळ त्याच्या ग्राहक/कर्जदारास नव्हे तर सर्वसामान्य लोकांसाठी ही फ्रॅकींग सुविधा दिली आहे. बँक या सेवेसाठी नाममात्र कमीशन घेते.

रु. ५००० पर्यंत चे दस्तऐवज फ्रँकिंग करायचे असल्यास रु. 10/- प्रती दस्तऐवज इतके नाममात्र शुल्क आकारले जाते.

विश्वास बँकेच्या खालील शाखांमध्ये फ्रँकिंग सुविधा उपलब्ध आहे.

एच.पी.टी. कॉलेज रोड शाखा

फ्रँकिंग सुविधा वेळ

सोमवार ते शुक्रवार – सकाळी 10.00 ते सायं. 6.00.
पहिला व तिसरा व पाचवा शनिवार – सकाळी 10.00 ते सायं. 5.00.
दुसरा व चौथा शनिवार व रविवार बंद.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test