आमच्या विषयी

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला श्री. विश्वास ठाकूर यांचे रूपाने अभ्यासू व प्रामाणिक नेतृत्व मिळाले आहे. सहकारधुरिणांच्या विचारांचा संपन्न वारसा घेऊन त्यांची वाटचाल सुरु आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात नागरी सहकारी बँकांची उत्तम सेवा तरूण पिढीला सहकारी बँकांकडे आकर्षित करणे, कोअर-बँकींग, संगणकीकरण अशा काळाशी निगडीत वैशिष्ठपूर्ण बाबींचा व्यवस्थापनात स्वीकार करण्यासाठी श्री. विश्वास ठाकूर यांनी परिणामकारकपणे अभ्यासपूर्ण दिशा दिली आहे. नाशिक-पुणे-मुंबई या अर्थत्रिकोणातील शहरवासियांच्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी श्री. विश्वास ठाकूर यांनी मंगळवार, दि. 25 मार्च 1997 रोजी विश्वास को-ऑप बँक लि., ची स्थापना केली. बँकेच्या आजपर्यंत एकूण 11 शाखा आहेत.

बचत/स्वयंसहाय्यता गटास अर्थसहाय्य करणारी व फॅक्रींग सुविधा उपलब्ध करून देणारी विश्वास बँक ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी बँक होय. नाशिक जिल्ह्यातील नागरी सह. बँकेच्या अधिकारी/कर्मचार्याना उत्कृष्ठ प्रशिक्षण देणार्‍या तसेच कर्मचार्‍यांसाठी अद्यावत लायब्ररी, कॉम्प्युटर लॅबची सोय असलेल्या विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुटची बँकेने स्थापना केली असून, या प्रशिक्षण केंद्रास मा. सहकार आयुक्त यांची मान्यता मिळालेली आहे.

प्रशिक्षण केंद्रात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अनेक अधिकार्‍यांसह सहकार क्षेत्रातील अनेक नामवंत व तज्ञ व्यक्तींचे वेळोवेळी मार्गदर्शन होत असते. विश्वास को-ऑप बँकेने भारतात सहकार क्षेत्रातील आदर्श बँकींगची संकल्पना रुजविली आहे. विश्वास बँकेने तयार केलेली आदर्श व्यवस्थापन प्रणाली (एम.आय.एस.) सहकार क्षेत्रात आज मैलाचा दगड ठरली आहे. सहकार संस्थांच्या कामकाजात सुःसुत्रता व गुणात्मक मुल्य वाढविण्याच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या समित्यांवर बँकेचे अध्यक्ष श्री. विश्वास ठाकूर कार्यरत आहे.

बँकेला सातत्याने अ वर्ग व प्रथम श्रेणी मिळत आहे. 99 टक्क्यांपेक्षा जास्त कर्जवसुली, एन.पी.ए. 0% , सुरक्षीत ठेव योजना, ठेवींवर आकर्षक व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर बँक देत आहे. कोअर बँकींगमुळे शाखा संलग्नता, भारतातील 2 लाख 26 हजाराहून अधिक ए.टी.एम.च्या माध्यमातून डेबीट कार्ड सुविधा, आर.टी.जी.एस/ एन.ई.एफ.टी.,पॉस सुविधा, सी.टी.एस. चेक बुक, एस.एम.एस. सुविधा, वाहन खरेदी, घर, गाळा, खरेदी, सोनेतारण, वैयक्तीक, कॅश क्रेडीट, हफ्तेबंदी अशा विविध कर्ज योजना, कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर जलद कर्जमंजुरी, कर्जावर वाजवी व्याजदर हे बँकेच्या सेवेचे उदिष्ट्य आहे.

दैनिक विश्वसंचय योजना, आधारकार्ड संलग्नीत खाते, फ्रॅकींग सुविधा, पॅनकार्ड सुविधा, सर्व प्रकारचा टॅक्स भरणा, वीजबील/टेलीफोन बील भरणा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा वीमा योजना, किशोर विश्वसंचय योजना, लॉकर्स सुविधा, एस.एम.एस. सुविधा, रूपे डेबीट कार्ड सुविधा बँकेच्या प्रगतीशील वाटचालीचा मानबिंदू आहेत. विश्वास बँकेने वार्षिक अहवाल, कँलेडर्स यातील आकर्षक रंगसंगती कल्पकतेमुळे नेहमीच कौतुकास्पद ठरली आहे. बँकींगबरोबर सामाजिक, सांस्कृतीक क्षेत्रातील कार्याचा वसा बँक जोपासत आली आहे.

शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून बँकेने नेहमीच समकालीन विषयांचे प्रबोधनपर संदेश दिलेले आहेत. त्यालाही उस्फुर्त प्रतिसाद लाभला. अंधश्रद्धा निर्मुलन, ध्वनीप्रदुषण, मोबाईल वापरतांना घ्यावयाची काळजी, रोज चालण्याचे फायदे, हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, पाण्याची बचत, रस्ता सुरक्षा अशा अनेक विषयांवर बँकेने शुभेच्छापत्रे बँकेने प्रकाशित केलेली आहे. लोकसभा/विधानसभा निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर बँकेने मतदान करण्याविषयी जनजागृतीपर संदेश दिला व मतदान केल्यानंतर भेटवस्तू म्हणून पैसे साठविण्यासाठी कॉईन बॉक्स देण्यात आला.

स्वाईन फ्ल्यु रोगाविषयक प्रतिबंधक उपायांबाबत जनजागृती करणार्‍या माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. सुमारे 3 लाखाहून अधिक पत्रके शाळा-महाविद्यालये, मेडीकल स्टोअर्स, बस/रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी वाटप करण्यात आले. बँकेच्या अशा अनेक उपक्रमांची प्रसारण माध्यमांनी चांगली दखल घेतली आहे.

बँकेतर्फे कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी मोमेंन्टम ऑर्गनायझेशन, सहकारवर्धिनी अशा प्रशिक्षण संस्थांमार्फत सातत्याने प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातात. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, यशदा, वैकुंठभाई मेहता, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ इत्यादी संस्थांमध्ये बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात येते.

महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणारी विश्वास बँक ही महाराष्ट्रातील पहिली नागरी सहकारी बँक आहे. त्याचबरोबर बचत गटांना मार्गदर्शनपर प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन बँकेतर्फे सातत्याने करण्यात येतात. सुवर्ण जयंती स्वयंरोजगार योजना, बचत गट स्थापन करण्याची पद्धती, व्यवसाय कसा करावा? संघटन शक्तीचे महत्व, महिला बचत गटांना घरगुती करता येण्याजोगे व्यवसाय, बँकेशी व्यवहार कसा करावा? गटसंकल्पना, कार्यपद्धती, गटांच्या मालाची विक्री व व्यवस्थापन या विविध घटकांवर बँकेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. बचत गटाच्या यशस्वी महिलांच्या मुलाखती विविध उपक्रम या माध्यमातून बँकेतर्फे राबविले जातात.

मुख्य कार्यालय संपर्क

location-icon
विश्वविश्वास पार्क,
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३
contact-icon
९१-२५३-२३०५६०० /०१ /०२ /०३
time-icon
सकाळी - ९.३० ते संध्या. - ६.००
time-icon
info@vishwasbank.com
Website Security Test