जलद दुवे
कर्ज योजना
मुख्य कार्यालय संपर्क

स्वातंत्र्यवीर सावरकर नगर,
गंगापूर रोड,
नाशिक, महाराष्ट्र, भारत
पिन कोड - ४२२०१३




ए.पी.बी.एस. – आधार पेमेंट कार्यप्रणाली नोंव्हेंबर 2014 पासून केंद्र सरकारने चालू केलेली आहे. त्याचे फायदे एल.पी.जी. गॅस सबसिडीसाठी 54 जिल्हे, 11 राज्यात 15 नोव्हेंबर 2014 पासून सुरु करण्यात आली आहे. कोणत्याही एल.पी.जी. गॅस ग्राहकाला त्याच्या कॅश पेमेंट मध्ये कोणताही फायदा मिळणार नसून, आधारकार्ड बँक खात्याला जोडल्यावरच सदरची सबसिडी जमा होणार आहे.
आधारकार्ड जोडण्याची प्रक्रिया – तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार क्रमांक रजिष्टर करणे आणि ग्राहकाने एल.पी.जी. गॅस फॉर्म नं. 1 भरून अधिकृत गॅस विक्रेत्याकडे देणे.
बँकेकडे आधार क्रमांक लिंक झाल्यानंतर एन.पी.सी.आय. कडे सदरचा नंबर वर्ग करण्यात येतो. त्यानंतर त्याचा खात्यात गॅस सबसिडीची रक्कम जमा होते. ज्यावेळी तुम्ही गॅस सिलेंडर खरेदी करता, त्या भावाने सिलेंडर खरेदी केलेली रक्कम त्यावर मिळणारी सबसिडी केंद्र सरकारद्वारा बँकेच्या ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा होतात.